आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशा सहित डीबीटी चे पैसे त्वरित द्या, अन्यथा मोठे जनआंदोलन करण्याचा जिल्हा युवक काँग्रेस चा इशारा…
गडचिरोली l सुखसागर झाडे
जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने शासकीय आश्रम शाळा चालवल्या जातात या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांसह शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत असते मात्र यावर्षी अजून पर्यंत गणवेश उपलब्ध करून देण्यात आले नाही. विशेष बाब म्हणजे शासकीय आश्रम शाळांमध्ये निवास व भोजनाची व्यवस्था असल्यामुळे येथे स्वयंपाकासाठी मनुष्यबळ कर्मचारी असणे आवश्यक आहे मात्र अनेक शाळांमध्ये यासाठी लागणारा मनुष्यबळ कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. करिता गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे अन्यथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे मोठ्या जण आंदोलन उभारण्यात येईल असे निवेदन संबंधित अधिकारी वहिद शेख सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग गडचिरोली यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, गडचिरोली नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक श्रीकांत देशमुख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, शहराध्यक्ष विवेक घोंगडे, अमित तलांडे, लालाजी सातपुते, अनिकेत राऊत, अभिजित धाईत, गौरव येणप्रेड्डीवार, कुणाल ताजने आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.









