महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…
राजुरा, ५ डिसें. :- गेल्या सात वर्षांपासून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रम रक्तदुत अमोल राऊत यांच्या नेतृत्वात नागवांश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था राजुरा वतीने आयोजित करण्यात येतो. यावर्षीही सदर अनोख्या अभिवादन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी (६ डिसेंबर) त्यांच्या विचारांना व त्यांच्या स्मृतीस विनम्र भावपूर्ण आदरांजली रक्तदानाच्या माध्यमातून वाहण्यात येत आहे. सदर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संविधान चौक, गटसाधन केंद्र राजुरा येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन नागवंश युथ फोर्स संस्थेद्वारे करण्यात आले आहे.








