Home चंद्रपूर घुग्घूस शहराला दारू हब बनविण्याचे शासनाचे षडयंत्र 

घुग्घूस शहराला दारू हब बनविण्याचे शासनाचे षडयंत्र 

0
120

घुग्घूस शहराला दारू हब बनविण्याचे शासनाचे षडयंत्र 

मंदिरा जवळ देशी दारूच्या दुकानाला दिलेली परवानगी रद्द करा : काँग्रेस

घुग्घुस काँग्रेस कार्यालयात घेतली पत्रपरिषद

घुग्घूस – शहर हा औ‌द्योगिक शहर असून शहरात आधीच 22 बियर बार 5 बियर शॉपी व 04 देशी दारूचे दुकान आहे. या शहराला महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच स्थानिक सत्ताधारी नेत्यांच्या आशीर्वादाने दारू हब बनविण्याचा षडयंत्र रचल्या जात आहे. नगरपरिषदेतून कुठलीच परवानगी न घेता तसेच शहरातील जनतेला कुठल्याही प्रकारे माहिती न देता अगदी गुपचूपपणे देशी दारू भट्टीच्या दुकानाला शहरातील बहिरम बाबा नगर प्रभाग क्रं 03 येथील मुख्य मार्गावर चिमूर येथून देशी दारूचे दुकान स्थलांतरीत करून आणण्यात येत आहे. ही देशी दारू भट्टी जेथे उघडण्यात येत आहे याठिकाणी जवळच हनुमान मंदिर आहे याच ठिकाणी शाळेकरी मुलांचे ऑटो येतात मुलांना शाळेत सोडण्यासाठी आई बहिणी येतात त्यांना या देशीभ‌ट्टीचा दारुड्‌यांचा त्रास भोगावा लागेल अश्लील व घाणेरड्या शिवीगाळ एकावे लागेल याठिकाणी दारुड्यांचा झुंड राहील त्यात मारामारीचे प्रकार वाढीस लागेल ही सभ्य नागरिकांची वस्ती आहे. याठिकाणी मंजूर करण्यात येणारी देशी दारूच्या दुकानाची परवानगी तातळीने रद्द करण्यात यावी याकरिता स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेऊन या दारू दुकानाला विरोध करावा अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचा जनआंदोलन खेळण्यात येईल.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी, माजी सभापती रोशन पचारे,,माजी.उपसरपंच सुधाकर बांदूरकर, नगराध्यक्ष उमेदवार (काँग्रेस) दिप्तीताई सोनटक्के तसेच जेष्ठ, सामाजिक, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!