सौ. पुष्पाताई रामटेके घुग्घुस शहरातील प्रभाग ४ मध्ये अपक्ष पुन्हा रिंगणात
जनता, जनार्दन ठरवणार पक्ष येणार का अपक्ष निवडुन देणार
घुग्घुस येथील प्रभाग क्र. ०४ मधील केमिकल वॉर्डातील नगरसेविकासाठी अपक्ष सौ. पुष्पाताई रामटेके या आगामी निवडणुकीत दुसऱ्यांदा नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाल्या असून त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्यावेळी अपक्ष ग्रामपंचायत निवडणूक लढली चांगलेच शेकडोच्यावर मत मिळाली होते अपक्ष असल्याने पराभव झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात भक्कम पाया निर्माण केलेल्या एकरे यांनी विविध सामाजिक कामात,तसेच वयाच्या ६१ व्या वर्षी अपक्ष उम्मीदवार प्रभाग ४ येथे नगरसेविकासाठी सक्रिय आहे असे नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांशी असलेला त्यांचा जवळचा संपर्क, साधेपणा आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा भांडवल ठरत आहे. अनेक सामाजिक प्रश्नांची सोडवणूक शक्य असल्याची जाणीव असल्याने त्या पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत.
त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग ०४ मधील निवडणुकीला खरा उमेदवार व विचाराचा रंग प्राप्त होणार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात असून त्यांची पसंती दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसत आहे.
बरेच पक्षातील निवडणूक आल्यावर नेत्यांकडून बोलण्यात येते की,कुपन,टोकण,जेवनाची व्यवस्था करण्यात येतात तसेच पैसा असेल तर निवडणूक जिंकता येते, परिसरातील नागरिकांकडून बोलण्यात येत असते.तसेच अपक्ष उम्मीदवार सौ.पुष्पाताई रामटेके आपले मनोगत व्यक्त करीत बोलण्यात येते की,ना मी कुपन देवु शकत नाही टोकण वाटु शकत मोठे नेते पैसाच्या बळावर काही बोलु शकते!
मी निष्ठावंत जनतेने मला निष्ठावंत निवडून दिले तर,मी हर समाजाचे एक माणुसकीच्या नातान काम करील निवडून नाही आले तरी समाजसेवा करीत राहिल.
आता जनता, जनार्दन ठरवणार की, पैसा असेल तर निवडणूक जिंकता येते,हेच तर जनता, जनार्दन बदलनार आहे,सामान्य जनतेने विचार करून मतदान करीन
असेही बोलण्यात येत आहे.








