Home गडचिरोली श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती

श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती

0
135

श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती

विश्वात्मा युवा मंडळचा कौतुकास्पद स्तुत्य उपक्रम

चामोर्शी – सुखसागर झाडे
विश्वात्मा युवा मंडळ वाकडी यांच्या वतीने श्रमदानामधून मुरखळा चक ते वाकडी 3 किमीचा रस्ता पुर्णत्वास नेला. पुर्वी रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. अत्यंत खराब व मोठ मोठे खडे पडल्यामुळे गावात येणारी बस परिवहन महामंडळाने बंद केली होती.
जुनी वाकडी व नवीन वाकडी येथील शालेय विद्यार्थ्यांचे बेहाल झाले होते. १० ते १२ किमी चा खडतर प्रवास हा सायकिलने करुन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत होते परंतु त्यांचा वाली कोणीही झाला नाही.
प्रशासनाला कित्येक निवेदन देण्यात आले तरी सुस्त झालेले प्रशासन सदर बाबीकडे कानाडोळा करीत दुर्लक्ष करीत होते. आपल्या गावच्या समस्या समजून विश्वात्मा युवा मंडळ व शाळकरी विध्यार्थी व विध्यार्थीनी यांनी स्वतः श्रमदान करण्याचा विळा उचलला व रस्ता तयार करून घेतला.
सदर कामास मदतीचा हात ऍडव्होकेट श्रीकांतभाऊ सुरजागडे व . दिगांबरभाऊ धानोरकर ,अमोल भाऊ मंगर , विनोद कुमरे,सुरज झगडकर,रोहित झगडकर, गुलशन काकडे, सोनल रोहणकर,रोहित उईके, साहिल गावडे गौरव कुत्तरमारे, आदित्य कुत्तरमारे, हर्षल खरबनकर, अनुराग बावणे, सौरव मिसार, श्रीकृष्ण बावणे,सुमित मडावी, सुंदर भोयर,नमन भोयर, ध्रुप काकडे,अनुराग खरबनकर, नैतिक गावडे, संदेश म्हशाखेत्री, ईशा काकडे, हसीना धंदरे, पायल काकडे,रिया झगडकर,चैताली काकडे,प्रणिता खरबनकर,निवृत्ता पोलजवार, प्रतिक्षा नवघडे आदी नवयुवक वर्गाने मोठ्या मेहनतीने मार्ग सुखकर केला आहे. परिसरातील नागरिकांकडून मोठे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!