Home चंद्रपूर जमाअत – ए – इस्लामी हिंद तर्फे शेजाऱ्यांच्या हक्कांवर देशव्यापी मोहीम सुरू

जमाअत – ए – इस्लामी हिंद तर्फे शेजाऱ्यांच्या हक्कांवर देशव्यापी मोहीम सुरू

0
128

जमाअत – ए – इस्लामी हिंद तर्फे शेजाऱ्यांच्या हक्कांवर देशव्यापी मोहीम सुरू

 

जमाअत – ए – इस्लामी हिंद चे (JIH) अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसेनी यांनी “आदर्श शेजार, आदर्श समाज” या ब्रीद वाक्याखाली “शेजाऱ्यांच्या हक्कांसाठी मोहीमCampaign for the Rights of Neighbours नावाची दहा दिवसांची देशव्यापी मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हि मोहीम २१ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत देशभर राबवली जाणार आहे. या दहा दिवसांच्या मोहिमेचा उद्देश शेजाऱ्यांशी चांगली वागणूक व सद्भावना पुन्हा जागृत करणे आणि सामाजिक संबंध मजबूत करणे हा आहे.

प्रसार माध्यमांना दिलेल्या निवेदनात अध्यक्षांनी सांगितले की, इस्लाम मध्ये शेजाऱ्यांच्या हक्कांवर खूप भर देण्यात आला आहे. ज्यामुळे ते एका सुसंवादी समाजाचा आधारस्तंभ बनतात. कुरआन मध्ये स्पष्टपणे अज्ञा दिली आहे की केवळ जवळ रहनाऱ्याशीच दयाळूपणे वागू नका, तर जे तात्पुरते शेजारी बनतात, म्हणजेच सोबत असणारे सोबती यांच्याशीही दयाळूपणे वागा. यामध्ये कार्यालयातील सहकारी, सहप्रवासी आणि अगदी पायी चालणारे सहकारी यांचाही समावेश होतो. या मोहिमेद्वारे आम्ही मुस्लिमांना या महत्वाच्या शिकवणुकी ची आठवण करून देऊ इच्छितो आणि त्यांना आदर्श शेजारी बनण्यासाठी प्रेरित क्री इच्छितो, जेणेकरून इस्लामचे खरे रूप मांडता येईल.

JIH अध्यक्ष पुढे म्हणाले, चांगल्या शेजार धर्माच्या पायावर उभारलेला समाज नैसर्गिकरित्या एक आदर्श समाज बनतो. जेव्हा शेजारी एकमेकांशी दयाळूपणे, क्षमाशिलतेने आणि न्यायाने वागतात, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समुदायमध्ये घडवून आणतो. आम्हाला आशा आहे की ही मोहीम केवळ शेजाऱ्यांमधील वाद मिटवणार नाही तर करुणा आणि सामाजिक जबाबदारीच्या इस्लामिक मूल्यांची एक शक्तिशाली साक्ष म्हणूनही काम करेल.

“शेजाऱ्यांच्या हक्कांसाठी मोहिमेचे” राष्ट्रीय निमंत्रक मुहम्मद अहमद यांनी स्पष्ट केले की, ही मोहीम शहरी भागातील वाढत्या व्यक्तिवादाच्या प्रवृत्तीवर लक्ष केंद्रित करते. ज्यामुळे शेजारधर्म सबंधाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी जोर दिला की, या मोहिमेचा उद्देश परस्पर करुणा, सहकार्य, स्वच्छता आणि वाहतूक शिस्त यांना इस्लामिक सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून प्रोत्साहन देणे आहे.

या मोहिमेत विविध उपक्रमांचा समावेश आहे, ज्यामध्ये सर्व धर्माच्या शेजाऱ्यांच्या भेटीगाठी, चहापान, महिला आणि तरुणांसाठी विशेष कार्यक्रम, सामूहिक स्वच्छता मोहीम, रस्ता हक्कांवर जनजागृती रॅली आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश आहे. आंतरधर्मीय सलोखा बळकट करण्यासाठी आणि इस्लाममध्ये गैरसमज दूर करण्यासाठी बिगर – मुस्लिम बांधव आणि भगिनी शी संपर्क साधण्यावर भर दिला जाईल. या मोहिमेमध्ये ‘ नो युअर नेबर ‘ (तुमचा शेजारी ओळख) उपक्रम, शेजार – संस्कृती स्नेहसंमेलन आणि मोहिमेनंतरही सातत्यपूर्ण संवाद आणि पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक समित्यांची स्थापना यांचाही समावेश असेल. असे राज्य पातळीवर जमाअत – ए – इस्लामी हिंद, महाराष्ट्र चे राज्य सचिव मुहम्मद जफर अन्सारी यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!