Home चंद्रपूर घुघ्घुस शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख बंटी घोरपडे यांनी दिला राजीनामा

घुघ्घुस शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख बंटी घोरपडे यांनी दिला राजीनामा

0
517

घुघ्घुस शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख बंटी घोरपडे यांनी दिला राजीनामा

दि. १२ नोव्हे. :- बंटी घोरपडे शहर प्रमूख शिवसेना (उबाठा) गट यांनी आज शहर प्रमुख पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख यांच्याकडे सादर केला आहे.

यासोबतच ज्येष्ठ नेते बाळू चिकणकर व अजय जोगी शिवसेना पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सदर राजीनामा हा वैयक्तिक कारणांमूळे निर्णय घेत असून पूढील काळात पक्षाच्या कोणत्याही स्तरावर कार्य करणे आम्हाला शक्य नाही असे त्यांनी राजीनामा पत्रात सांगितले आहे.

शिवसेना मध्ये कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही सर्व वरिष्टांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षाच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा! असा उल्लेख करत त्यांनी आपला राजीनामा जिल्हा प्रमुख यांच्याकडे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!