Home चंद्रपूर विरूर स्टेशन येथे अजगराची धडक! सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दिलं जीवदान

विरूर स्टेशन येथे अजगराची धडक! सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दिलं जीवदान

0
285

विरूर स्टेशन येथे अजगराची धडक! सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दिलं जीवदान

 

विरूर स्टेशन (राजुरा) l अविनाश रामटेके
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील रहदारीने गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक शनिवारी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास तब्बल 10 फूट लांबीचा आणि अंदाजे 25 किलो वजनाचा अजगर साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

अचानक सापडलेल्या या प्रचंड अजगरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा विरुर स्टेशन येथील याची माहिती देण्यात आली मात्र या भीतीच्या काळात सर्पमित्र रवी खोबरे, रविकांत ताकसांडे आणि गौरव जीवतोडे हे घटनास्थळी धाव घेऊन आले. त्यांनी शांतपणे आणि कौशल्याने अजगराला सुरक्षितरित्या पकडून कोणतीही इजा न पोहोचवता त्याला पकडून सुब्बई जंगलात सोडून त्याचं जीवदान दिलं.

या धाडसी आणि संवेदनशील कार्यामुळे नागरिकांकडून या सर्पमित्रांचे जोरदार कौतुक होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे वन्यजीव संरक्षण आणि प्राणिमित्रतेचा सुंदर आदर्श उभा राहिला आहे.

स्थानिकांनी सांगितले की, “अशा घटना घडल्यावर सर्पमित्र तत्परतेने धाव घेतात, त्यामुळे लोकांना सुरक्षितता मिळते आणि सापाचाही जीव वाचतो.”

मात्र अजूनही विरूर येथील सर्पमित्र यांना शासना कडून मदत तर नाहीच परंतु यांच्या सुरक्षा संबंधित कोणतेही अजून पाऊल न उचल्याने विरूर परिसरातील जनतेसाठी व सापासाठी यांना जीवनदान देण्याकरिता धावून येण्याऱ्या या सर्पमित्र योग्य न्याय द्यावा अशी मागणी होताना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!