आधार कार्ड मतदान कार्डशी जोडण्याची विजय लाड यांची मागणी
चामोर्शी – सुखसागर झाडे
चामोर्शी : सद्या आधार कार्डशिवाय साधे कुठलेही काम होत नाही. जेमतेम प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डशिवाय कोणतेही मिळत नाही. त्याच धर्तीवर आधार कार्ड मतदार कार्डशी जोडल्यास मतचोरी सारख्या प्रकाराला आळा बसू शकतो. त्यासाठी आधार कार्ड मतदान कार्डशी जोडण्याची मागणी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी केली आहे.
सर्व नागरिकांचे आधार कार्ड सद्या पॅन कार्ड, बॅंक अकाऊंटला, शालांत परीक्षांना ,गॅस सिलेंडरला ,मोबाईल नंबरला , नोकरीवर हजेरीला , सरकारी योजनांचा फायदा घेण्या साठी जोडणे आवश्यक केले.
मात्र मतदार कार्डशी आधार कार्ड जोडणे शिल्लक राहिले असून आधार कार्ड मतदान कार्डशी जोडण्याची मागणी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी केली.









