लेख – पंकज रामटेके
घुग्घुस शहरात समाजीकरण दुर तर राजकारण करीत दिवाळी सुरुवात…
गोरगरीब व्यवसाय करणाऱ्यांकडून भाव-तोल करू नका…
छोटासा व्यवसाय करणाऱ्यांना दिवाळीत श्रीमंत करा
आज दिवाळी आहे,अनेकानेक शहरातील बाजारपेठ, गांधीचौक व शहरासारख्या ठिकाणी दुकानापेक्षा रस्त्यावरील विक्रेत्यांकडून दिवाळीत लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यालाच लोक पंसती देताना आहेत,परंतु भाव-तोल करून गरीब सामान्य व्यवसाय करण्यालाच मन दुखवत खरेदी करतात.
दिवाळी सारख्या सर्वात जास्त खरेदी करणारा सण असुन दिवाळीच गरीब व्यवसाय करणारे फक्त दहा दिवस उत्साहात जाणीवपूर्वक प्रयत्न करावा पण असे दिसता येत नाही, श्रीमंतानी थोडक्यात कमी खर्च करा पण गरिबाची पण दिवाळी श्रींमतावानी होवु द्या.
राजकारणी रस्त्यावर उतरायच्या आणि कशासाठी आंदोलन करायच्या? तर दिवाळी निमीत्त दोनतीन किलो रवामैदा व डालडा सारखे वनस्पती तुप अधिकचे मिळाले पाहिजे, म्हणून जोरदार आंदोलने सुरू व्हायची. त्यातून दिवाळी जवळ आली हे लोकांना कळायचे. या महिला पक्षभेद मतभेद विसरून मंत्रालयात घुसायच्या आणि लाठ्या झेलून गरीब जनतेच्या तोंडी गोडधोड पडावे, म्हणून कष्ट काढायच्या. त्याच्या बातम्या झळकत, तेव्हा लक्षात यायचे की दिवाळी आली. कारण सामान्य जनता खुप गरीब होती. पण त्यांची दिवाळी खुप श्रीमंत होती.
आता पहिल्यांदाच शहरात दिसुन येत आहे की,घुग्घुस शहरातील वार्डा-वार्डातील, प्रभागात दिवाळी सण दुर्लक्ष करीत मी भावी नगरसेवक पोस्टर्स बनवुन सोशल मिडीया,फेसबुक, इंस्टाग्राम अशाप्रकारे ॲपवर टाकत आहेत पण दिवाळी सारखा सणाकडे लक्ष नाही राजकारणकडे लक्ष वेधले, पहिले समाजकारण करा मग राजकारण करा समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून येणारच आहे भावी नगरसेवक म्हणुन फिरणारा आजकालचे काही नेते पहिले का करित होते, आता का करू शकतात फक्त संस्ट बाजी सोशल मिडीयावर चालत आहे असे नागरिकांकडून वारंवार बोलण्यात येत आहे, पहिले गोरगरीब जनतेचे विचार करा दिवाळी चालु झाली आहे.
फक्त राजकारण लोकांना राजकारणी पद घेता येते पण काम करायला जनतेशी संवाद साधणार नाही असे नागरिकांकडून बोलण्यात येते की, फोन उचलत नाही,बिजी, वेळ नाही पण सोशल मिडियावर जागृत राहणार मी आयुष्यभर का केले लवकरात लवकर नगरपरिषद निवडणूकीत जनता राजकारण करीत लोकांना जागा दाखवून देऊ असे सकारात्मक चर्चा अनेकानेक चाय टपरी,हॉटेल, मालीच्या दुकानात बोलण्यात येत आहे.
दिवाळी जवळपास येता महिलेनी आमरण उपोषण करण्यात आले,तर कुणी भावी नगरसेवक पोस्टर्स मध्ये व्यस्थ, तर कुणी मतदार यादी पाहण्यात व्यस्थ, तर कुणी गरबा नृत्य दांडिया उत्सवात व्यस्थ तर कुणी निवडणुकीत निवडून कसे यांचे कुणाला कसे पद रिक्त करायाचे याच्यात व्यस्थ पण दिवाळी गोरगरीब व्यवसाय व जनतेची कशी होणार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत दिसत आहे तर ऐकीकडे नगरसेवक पोस्टर्स बनवुन सोशल मिडियावर जागृत होण्याची वेळ चालत आहे दिवाळी झाल्यानंतर लगेचच नगरपरिषद निवडणूक लवकरच लागणार तिथे जनता कुणाले भावी नगरसेवक कुणाले बनवनार असे चित्र दिसत आहेत,पण यावेळी जनता जागृत राहणार काही त्यांची अपेक्षादेखील नेतांना जागा दाखवून देऊ असे आवाहन जनतेत होत आहे.
काहींच्या घरात फटाके फुटतात तर काहींच्या आयुष्यात फटके बसतात..!!
दिवाळी सगळ्यांची एकच नसते !! कोणाची उजळते तर कोणाची विझते…!








