Home चंद्रपूर राजुरा तहसील कार्यालयात विजेचा अपव्यय ; जनतेच्या पैशांची बेजबाबदार उधळपट्टी!

राजुरा तहसील कार्यालयात विजेचा अपव्यय ; जनतेच्या पैशांची बेजबाबदार उधळपट्टी!

0
217

राजुरा तहसील कार्यालयात विजेचा अपव्यय ; जनतेच्या पैशांची बेजबाबदार उधळपट्टी!

राजुरा (ता. प्र.) : राजुरा तहसील कार्यालयात आज प्रशासनाचा बेजबाबदार चेहरा उघडकीस आला. तहसीलदार आपल्या दालनात हजर नसताना देखील लाईट्स व पंखे सुरू ठेवण्यात आले होते. वीज अशा प्रकारे वाया घालविण्याचा प्रकार स्पष्टपणे जनतेच्या घामाच्या पैशाचा अपव्यय असल्याचे चित्र समोर आले.

गोरगरीब शेतकरी, मजूर वर्ग आपला घाम गाळून शासनाला कर व करच भरण्यासाठी जीव तोड मेहनत करतो. त्यातूनच शासन वीजबिल आणि नगरपरिषदेकडे कराची वसुली करत असते. मात्र, या साऱ्याचा बेजबाबदार वापर सरकारी अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे.

आजही तालुक्यातील अनेक गावे वाड्या-वस्त्यांवर वीजपुरवठ्याची टंचाई पसरली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही अनेक नागरिक विजेचे तोंडसुद्धा पाहू शकलेले नाहीत. तरीदेखील सरकारी दालनात मात्र हवेत पैसे उडविल्यासारखी वीज उधळली जात आहे.

यातून स्पष्ट होते की, ज्यांच्या खिशातून वीजबिल भरायचेच नाही त्यांना विजेचे महत्त्व कधीच कळणार नाही. मात्र, कर वेळेवर भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात हा प्रकार खोच लावणारा आहे.

📢 प्रशासनाने अशा अपव्ययाकडे गांभीर्याने पाहावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अन्यथा जनतेत रोष निर्माण होणे अपरिहार्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!