Home गडचिरोली गडचिरोलीत आश्चर्याचा मोठा धक्का – ६ वरिष्ठ माओवादी पोलीस महासंचालकंच्या रश्मी शुक्ला...

गडचिरोलीत आश्चर्याचा मोठा धक्का – ६ वरिष्ठ माओवादी पोलीस महासंचालकंच्या रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पित

0
203

गडचिरोलीत आश्चर्याचा मोठा धक्का – ६ वरिष्ठ माओवादी पोलीस महासंचालकंच्या रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पित

 

सुखसागर झाडे

गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल ६ वरिष्ठ माओवादी महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पित झाले. या सर्वांवर राज्य शासनाने एकत्रितपणे ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन डिव्हीसीएम, एक कमांडर, दोन पीपीसीएम आणि एक एसीएम यांचा समावेश होता.

आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादींची नावे व पदे पुढीलप्रमाणे आहेत

भिमन्ना उर्फ सुखलाल उर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे – डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टीम

विमलक्का उर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक – डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टीम इंचार्ज

कविता उर्फ शांती मंगरु मज्जी – कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टीम

नागेश उर्फ आयताल गुड्डी माडवी – पीपीसीएम, कंपनी क्र. १०

समीर आयतू पोटाम – पीपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्नीकल टीम

नवाता उर्फ रुपी उर्फ सुरेखा चैतू मडावी – एसीएम, अहेरी दलम

पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी आत्मसमर्पित माओवाद्यांचे स्वागत केले. या वेळी माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व जवानांचा सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी कवंडे, कोपर्शी-फुलनार व मोडस्के जंगल परिसरात माओवादी चकमकीत यश मिळालेल्या जवानांचा विशेष सत्कार करण्यात आला. या मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व सत्य साई कार्तिक यांचाही गौरव करण्यात आला.

आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या परतीच्या जीवनासाठी पुनर्वसन व बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भिमन्ना व विमलक्काला प्रत्येकी ८.५ लाख रुपये, कविता ५.५ लाख रुपये, नागेश ५ लाख रुपये, समीर व नवाता प्रत्येकी ४.५ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. तसेच पती-पत्नी एकत्र आत्मसमर्पण केल्यास अतिरिक्त १.५ लाख रुपये, गटाने आत्मसमर्पण केल्यास अतिरिक्त ४ लाख रुपये जाहीर आहेत.

गडचिरोली पोलीस नोंदीप्रमाणे आतापर्यंत ७१६ माओवादी आत्मसमर्पित झाले असून, चालू वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत ४० जहाल माओवादी आत्मसमर्पण करून शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. यापूर्वी दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी ताराक्का सिडाम सह ११ माओवादी, व ६ जून २०२५ रोजी डिव्हीसीएम सपनाक्का चौधरी सह १२ माओवादी आत्मसमर्पण करून दंडकारण्य विभागात मोठा धक्का बसला होता.

कार्यक्रमात उपस्थित होते: मा. डॉ. श्री. छेरिंग दोरजे (अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती), श्री. संदिप पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर), श्री. अजय कुमार शर्मा (उप-महानिरीक्षक, सिआरपीएफ), श्री. नीलोत्पल (पोलीस अधीक्षक, गडचिरोली), श्री. एम. रमेश (अपर पोलीस अधीक्षक, अभियान), श्री. सत्य साई कार्तिक (अपर पोलीस अधीक्षक, अहेरी), श्री. गोकुल राज जी (अपर पोलीस अधीक्षक, प्रशासन), श्री. सुमित वर्मा (उप-कमांडंट, सिआरपीएफ), श्री. अनिकेत हिरडे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा), श्री. विशाल नागरगोजे (पोलीस उप-अधीक्षक, अभियान) आणि अन्य अधिकारी व जवान.

यावेळी नक्षल हिंसाचारात मृत झालेल्या दोन नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे धनादेश दिले गेले. तसेच अतिसंवेदनशील ठिकाणावर स्थापन झालेल्या कवंडे पोस्टेला भेट देऊन पोलीस महासंचालकांनी जवानांशी संवाद साधला व त्यांचे प्रयत्न कौतुक केले.

गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे माओवादी चळवळीवर निर्णायक आघात झाला असून, अनेक माओवादी शस्त्र खाली ठेवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!