अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विकास परिषद संघटनेची बैठक संपन्न…
बैठकीत विविध विषयांकित बाबींवर विचारमंथन
सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास व नियोजन तथा गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गडचिरोली जिल्हा विकास परिषद गंभीर समस्यावर उपाययोजना व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याकरिता गडचिरोली जिल्हा विकास परिषद गडचिरोली विविध विषयांवर विचार विनिमय चिंतन बैठक शासकीय विश्राम गृह गडचिरोली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत प्रमुख उपस्थिती माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जेष्ठ पत्रकार रोहीदास राऊत, चंद्रशेखर भंडागे, बाळकृष्ण सावसाकडे, प्रकाश तांकसाडे, मनोहर हेपट, गुरुदेव भोपये, प्रकाश अर्जुनवार, विजय श्रुगारपंवार, माजी नगरसेवक गुलाब मडावी, भास्कर इंगळे, तुळशीराम सहारे माजी नगरसेवक, जाणिकराव नन्नवरे, दिवाकर साखरे, प्रविण घाटे,तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.









