Home गडचिरोली महाराष्ट्र शासनाने पारित केलेला जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा!

महाराष्ट्र शासनाने पारित केलेला जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा!

0
307

महाराष्ट्र शासनाने पारित केलेला जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा!

लोकशाही व संविधान विरोधी जन सुरक्षा कायद्याचा सर्व पक्षाच्या वतीने कडाडून विरोध

सर्व पक्षाच्या वतीने निदर्शने करीत गडचिरोली येथे भव्य धरने आंदोलन

 

महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता हे विधेयक तत्काळ रद्द करण्यात यावे या मागणीला जोर देत,
*विविध पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने करित त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्ष व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले लोकशाही व संविधान विरोधी जन सुरक्षा कायद्याचा कडाडून विरोध करण्यात आला.
जन सुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती गडचिरोली
विविध विरोधी पक्ष तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे “जन सुरक्षा कायदा रद्द” बाबत निदर्शने करण्यात आले.
यावेळी आपचे जेष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे, भास्कर इंगळे, संतोष कोटकर,केशवजी सातपुते, जाणिकरावजी ननावरे,नामदेव पोले, दिवाकरजी साखरे, तुळशीरामजी मोहूर्ले आदी आपचे जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!