Home गडचिरोली गडचिरोली पोलिसांचा अभिमान – पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते कर्तव्यनिष्ठ पोउपनि. वासुदेव...

गडचिरोली पोलिसांचा अभिमान – पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते कर्तव्यनिष्ठ पोउपनि. वासुदेव मडावी यांचा गौरव…

0
200

गडचिरोली पोलिसांचा अभिमानपोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते कर्तव्यनिष्ठ पोउपनि. वासुदेव मडावी यांचा गौरव…

 

सुखसागर झाडे
गडचिरोली पोलीस दलातील पार्टी कमांडर पोउपनि. वासुदेव राजम मडावी यांनी माओवादीविरोधी लढाईत दाखवलेल्या असामान्य शौर्य आणि नेतृत्वाबद्दल आज पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

पोउपनि. वासुदेव मडावी यांची कामगिरी
आजवर 26 वर्षांची सेवा (1998 पासून)
एकूण 58 चकमकींमध्ये थेट सहभाग
101 माओवादी कंठस्नान
05 जहाल माओवादी अटक
03 वेगवर्धीत पदोन्नती
पोलिस शौर्य पदक, असाधारण आसूचना कुशलता पदक, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

महत्त्वाच्या चकमकींमध्ये योगदान

बोरीया कसनासूर : 40 माओवादी कंठस्नान
गोविंदगाव : 06 माओवादी कंठस्नान
मर्दिनटोला : 27 माओवादी कंठस्नान
कोपर्शी-कोढूर : 05 माओवादी कंठस्नान
कतरंगट्टा : 03 माओवादी कंठस्नान
कोपर्शी : 04 माओवादी कंठस्नान

गडचिरोली पोलीस दलासारखे धाडसी आणि समर्पित जवान मिळणे ही खरी ताकद आहे. त्यांच्या शौर्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
अशाचं अनेक शुर पराक्रमी पोलीस जवान योद्ध्यांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरी मुळेच आज माओवाद संपुष्टात येऊन गडचिरोली अधिक सुरक्षित आणि शांततामय होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!