Home गडचिरोली चामोर्शी – हरणघाट मार्गाची दुरुस्ती करणार तरी कधी? जागोजागी खड्डे असल्याने प्रवाश्यांचा...

चामोर्शी – हरणघाट मार्गाची दुरुस्ती करणार तरी कधी? जागोजागी खड्डे असल्याने प्रवाश्यांचा जीवघेणा प्रवास…

0
187

चामोर्शी – हरणघाट मार्गाची दुरुस्ती करणार तरी कधी? जागोजागी खड्डे असल्याने प्रवाश्यांचा जीवघेणा प्रवास…

चामोर्शी, सुखसागर झाडे – हरणघाट मार्ग हा खड्डेमय झाला असून प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष्य नाही. तसेच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार व खासदार सुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याचे कुजबुज नागरिकांकडून होत आहे. सतत या रस्त्याच्या दुरुस्ती साठी विविध स्तरावरून मागणी होत असून प्रशासन दखल सुद्धा घेत नाही. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सर्व प्रवासी नागरिक त्रस्त आहेत.

जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशाने या रस्त्यावर जड वाहने नेण्यास प्रतिबंध असून सऱ्यास आदेशाची पायमल्ली करून मोठे मोठे जड वाहन ये जा करीत होती आहेत तरी प्रशासन झोपेत आहे
यामुळे परिणामी रस्त्याची अवस्था अगोदरपेक्षा दयनीय झाली आहे कुणालाच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची चिंता नाही.

या रस्त्याच्या मधोमध नाल्या तयार झाल्या आहेत. रस्ता आधीच खराब असून संपूर्ण रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यात सतत पाडणाऱ्या पावसाच्या पाण्याने हा रस्ता आणखी खराब झाला आहे. त्यामुळे नियमितपणे या रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक वर्षांपासूनची या परिसरातील नागरिकांची हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करावा, अशी मागणी आहे. पण ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले असता काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. पण तेव्हापासून आतापर्यंत लक्ष देण्यात आले नाही. या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. . त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांचे वाहन असंतुलित होऊन अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
भयंकर त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
चामोर्शी ते हरणघाट रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले  असल्याने वाहन धारक व सामान्य माणसाला मोठी दमछाक होत असून पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यात पाणी साचत्यामुळे तेथून वाहन काढणे कठीण होत आहे तरी या रस्त्याकडे संबंधित विभाग कानाडोळा करीत आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, आमदार व खासदार सुद्धा याकडे कानाडोळा करत आहेत,  रस्त्याचे काम तात्काळ दूरस्थ करावेत अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केले आहे.
चामोर्शी ते हरणघाट रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून त्या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी भरून असल्याने वाहन कुठून काढायचा हा प्रश्न निर्माण होत आहे तरी पण अद्याप दखल घेतली जात नाही याचे आश्चर्य वाटत आहे.
त्या मार्गाने येणा-या जाणा-या लोकांना व शाळेकरी मुलांना सुध्दा नाहक नास सहन करावे लागत आहे, विरुद्ध दिशेने भरधाव येणारे मोठे वाहणामुळे खड्यातील दुषित पाणी अंगावर उसळल असते, अंगावर असणारे वस्त्र चिखलमय होत असल्याने बहुतांश टुव्हिलर प्रवाशांना कधी कधी तर अर्ध्यातुनच घरी वापसी करावी लागत असून त्या खड्डेंमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, जिव मुठीत घेऊन प्रवासी वाटेतुन मार्गक्रमण करीत आहेत,त्यासाठी रस्त्याची दखल घ्यावी, जर चामोशी ते हरणघाट या रस्त्याच्या कामाला सुरवात न झाल्यास किंवा तात्पुरता स्वरूपात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचे इशारे काही संघटनेने दिले आहे, तरी परंतु प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे.या रस्त्याचे काम लवकरात लवकर दुरुस्ती करून दळणवळणासाठी मार्ग मोकळा करावा अशी सर्वसामान्य जनतेची आर्त हाक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!